सुकन्या कुलकर्णी-मोने आणि नृत्याची जिद्द
सागर साबडे (माजी सचिव - महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस ) गेल्या शनिवारी १६ नोव्हेंबरला लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळातर्फे दिवाळीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. अर्थात दिवाळी होऊन बरेच दिवस झाले असले तरी परदेशात आपल्या सवडीने हवे ते सण साजरे करण्याची मुभा असते. ("बरं झालं हं मंडळानं या वर्षी दिवाळी late ठेवली ते.. Last month I was so busy you know! त्या निमित्ताने का होईना मागच्या India visit मध्ये घेतलेले ठेवणीतले कपडे घालता येतात ना गं आपल्याला, नाहीतर ठेवून ठेवून खराब होतात I feel so sad na" असे एक ललना तिच्या भरजरी साडीची तारीफ करणाऱ्या दुसऱ्या एकीला सांगताना मी ओझरते ऐकले आणि या कार्याला आपला अंशतः का होईना हातभार लागला या विचाराने मी धन्य झालो! असो) या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून मंडळातर्फे कालिदासकृत मेघदूत आणि वैजयंती यावर आधारित नृत्य नाटिका सादर करण्यात आली. बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे हा कार्यक्रम अमेरिकेत अनेक मंडळात आयोजित करण्यात आला होता. स्मिता महाजन, प्रचिती देवचके-देसाई, अश्विनी अनोरकर, श्वेता काटोटे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने, यांनी यात सहभाग घेतल