पुल जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम
पुलजन्मशताब्दी निमित्त लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ/ अभिव्यक्ती आयोजित कार्यक्रमाचा आढावा सागर साबडे सचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ secretary@mmla.org (A shorter version of this is in BMM June 19 newsletter ) पु ल देशपांडे - महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. गेल्या शतकात अनेकांगांनी ज्यांनी आपलं सांस्कृतिक आयुष्य समृद्ध केलं आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेनं त्यांच्या कलावैविध्यतेवर मनस्वी प्रेम केलं त्यांची यावर्षी जन्मशताब्दी! काही जणांनी त्यांना सांस्कृतिक दैवत असंही म्हटलंय (अर्थात हे असं देवत्वपण पुलंना रुचलं नसतं हा भाग वेगळा!). (caricature: S D Phadnis) पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम करावा असं लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळाच्या समितीला वाटत होत पण नक्की काय करावं हे काही सुचत नव्हतं. तितक्यात लॉस एंजेलिस स्थित 'अभिव्यक्ती ग्रुप' ने त्यांना असा कार्यक्रम करायला आवडेल असा प्रस्ताव पाठवला. अभिव्यक्ती ग्रुप म्हणजे इथला थिएटरशी संबंधी हौशी कलाकारांचा समूह. गेले १०-१२ वर्षे ते वेगव...