पळा पळा कोण पुढे पळे तो..
पळा पळा कोण पुढे पळे तो.. सागर साबडे सचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ secretary@mmla.org अनेकदा आपल्या आसपास काही "हिरो" (हिरे सुद्धा म्हणू शकतो) असतात पण आपल्याला त्याची जाणीव/माहिती नसते. आज मी आपल्या जवळच्या एका आगळ्या वेगळ्या चॅम्पियन बद्दल सांगणार आहे. तुम्ही नियमित पळणारे असला तर तुम्हाला हे आवडेलच पण अस्मादिकांसारखे पळण्याच्या विचारांपासून दूर पळणारे असाल तर हि गोष्ट नक्की तुम्हाला प्रेरीत करेल यात शंका नाही. मॅरेथॉन हि पळण्याची स्पर्धा माणसाच्या प्रकृतीचा, सहनशक्तीचा, चिकाटीचा मानदंड समजली जाते. जगात अनेक मॅरेथॉन प्रसिद्ध आहेत. त्यातील लॉस एंजेलिस, बॉस्टन, न्यूयॉर्क, शिकागो टोकियो व लंडन ह्या अधिक प्रसिद्ध स्पर्धा! २६.२ मैल पळून येणं हि काही सोपी गोष्ट नाही. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे! त्यासाठी प्रचंड तयारी करावी लागते. आहार, निद्रा आणि एकंदरीत जीवनात एक प्रकारची स्वयंशिस्त बाळगावी लागते. आपल्या दक्षिण कॅलिफोर्नियातील एकजण ह्या सहाही स्पर्धा पूर्ण करून आलेले आहेत असे सांगितलं तर कदाचित तुमचा व