पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुकन्या कुलकर्णी-मोने आणि नृत्याची जिद्द

इमेज
सागर साबडे (माजी सचिव - महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस ) गेल्या शनिवारी १६ नोव्हेंबरला लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळातर्फे दिवाळीचा कार्यक्रम सादर करण्यात आला.  अर्थात दिवाळी होऊन बरेच दिवस झाले असले तरी परदेशात आपल्या सवडीने हवे ते सण साजरे करण्याची मुभा असते.  ("बरं झालं हं मंडळानं या वर्षी दिवाळी late ठेवली ते.. Last month I was so busy you know! त्या निमित्ताने का होईना मागच्या India visit मध्ये घेतलेले ठेवणीतले कपडे घालता येतात ना गं आपल्याला, नाहीतर ठेवून ठेवून खराब होतात I feel so sad na" असे एक ललना तिच्या भरजरी साडीची तारीफ करणाऱ्या दुसऱ्या एकीला सांगताना मी ओझरते ऐकले आणि या कार्याला आपला अंशतः का होईना हातभार लागला या विचाराने मी धन्य झालो! असो) या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून मंडळातर्फे कालिदासकृत मेघदूत आणि वैजयंती यावर आधारित नृत्य नाटिका सादर करण्यात आली.  बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे हा कार्यक्रम अमेरिकेत अनेक मंडळात आयोजित करण्यात आला होता. स्मिता महाजन, प्रचिती देवचके-देसाई, अश्विनी अनोरकर, श्वेता काटोटे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने, यांनी यात सहभाग घेतल

पळा पळा कोण पुढे पळे तो..

इमेज
पळा पळा कोण पुढे पळे तो.. सागर साबडे सचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ secretary@mmla.org अनेकदा आपल्या आसपास काही "हिरो" (हिरे सुद्धा म्हणू शकतो) असतात पण आपल्याला त्याची जाणीव/माहिती नसते.  आज मी आपल्या जवळच्या एका आगळ्या वेगळ्या चॅम्पियन बद्दल सांगणार आहे.  तुम्ही नियमित पळणारे असला तर तुम्हाला हे आवडेलच पण अस्मादिकांसारखे पळण्याच्या विचारांपासून दूर पळणारे असाल तर हि गोष्ट नक्की तुम्हाला प्रेरीत करेल यात शंका नाही. मॅरेथॉन हि पळण्याची स्पर्धा माणसाच्या प्रकृतीचा, सहनशक्तीचा, चिकाटीचा मानदंड समजली जाते.  जगात अनेक मॅरेथॉन प्रसिद्ध आहेत.  त्यातील लॉस एंजेलिस, बॉस्टन, न्यूयॉर्क, शिकागो टोकियो व लंडन ह्या अधिक प्रसिद्ध स्पर्धा!   २६.२ मैल पळून येणं हि काही सोपी गोष्ट नाही.  तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे!   त्यासाठी प्रचंड तयारी करावी लागते.  आहार, निद्रा आणि एकंदरीत जीवनात एक प्रकारची स्वयंशिस्त बाळगावी लागते. आपल्या दक्षिण कॅलिफोर्नियातील एकजण ह्या सहाही स्पर्धा पूर्ण करून आलेले आहेत असे सांगितलं तर कदाचित तुमचा व

गदिमा/बाबूजी जन्मशताब्दी उत्सव कार्यक्रम

इमेज
गदिमा आणि बाबूजी जन्मशताब्दीनिमित्त लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ आयोजित कार्यक्रमाचा आढावा सागर साबडे सचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ secretary @mmla.org  यंदाचे वर्ष मराठी भाषिकांसाठी विशेष आहे.  महाराष्ट्राची तीन रत्ने - गदिमा, सुधीर फडके उर्फ बाबूजी आणि पु ल देशपांडे यांची या वर्षी जन्मशताब्दी आहे.   गदिमा आणि बाबूजी जोडीने एकेकाळी आपले शब्द ,स्वर व संगीत यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते.  सूर हे शब्द व त्यामागील भावनांना उमलवीत जातात. जसं शब्द व सुरांचं नातं अतूट असत, तसंच  गदिमा व बाबूजी यांचं नातं अतुट होतं. बाबूजीचे सूर व संगीताचे गुंजन आपल्या हृदयात कायमचे ठसले आहे आणि  शब्दांचे राजे असलेले,भक्तिगीतांपासून लावण्या व ग्रामीण संगीतापासून चित्रपट संगीत व गीतरामायण  रचणारे व ज्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणतात  अशा गदिमांची अनेक गीते अजरामर झाली आहेत.   त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळाने (MMLA) ९ फेब्रुवारीला सुधीर फडके आणि गदिमा यांच्या स्मृतीला आदरांजली म्हणून ' ज्योतिने तेजाची आरती ' नावाचा एक

पुल जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम

इमेज
पुलजन्मशताब्दी निमित्त लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ/ अभिव्यक्ती आयोजित कार्यक्रमाचा आढावा सागर साबडे सचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ  secretary@mmla.org (A shorter version of this is in BMM June 19 newsletter ) पु ल देशपांडे - महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व.  गेल्या शतकात अनेकांगांनी ज्यांनी आपलं सांस्कृतिक आयुष्य समृद्ध केलं  आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेनं त्यांच्या कलावैविध्यतेवर मनस्वी प्रेम केलं त्यांची यावर्षी जन्मशताब्दी!  काही जणांनी  त्यांना सांस्कृतिक दैवत असंही म्हटलंय (अर्थात हे असं देवत्वपण पुलंना रुचलं नसतं हा भाग वेगळा!). (caricature: S D Phadnis) पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम करावा असं लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळाच्या समितीला वाटत होत  पण नक्की काय करावं हे काही सुचत नव्हतं.  तितक्यात लॉस एंजेलिस स्थित 'अभिव्यक्ती ग्रुप' ने त्यांना असा कार्यक्रम  करायला आवडेल असा प्रस्ताव पाठवला. अभिव्यक्ती ग्रुप म्हणजे इथला थिएटरशी संबंधी हौशी कलाकारांचा समूह.   गेले १०-१२ वर्षे ते वेगवेगळी नाटके बसवत आहेत -- काही नावाजले