गदिमा/बाबूजी जन्मशताब्दी उत्सव कार्यक्रम
गदिमा आणि बाबूजी जन्मशताब्दीनिमित्त लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ आयोजित कार्यक्रमाचा आढावा सागर साबडे सचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ secretary @mmla.org यंदाचे वर्ष मराठी भाषिकांसाठी विशेष आहे. महाराष्ट्राची तीन रत्ने - गदिमा, सुधीर फडके उर्फ बाबूजी आणि पु ल देशपांडे यांची या वर्षी जन्मशताब्दी आहे. गदिमा आणि बाबूजी जोडीने एकेकाळी आपले शब्द ,स्वर व संगीत यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. सूर हे शब्द व त्यामागील भावनांना उमलवीत जातात. जसं शब्द व सुरांचं नातं अतूट असत, तसंच गदिमा व बाबूजी यांचं नातं अतुट होतं. बाबूजीचे सूर व संगीताचे गुंजन आपल्या हृदयात कायमचे ठसले आहे आणि शब्दांचे राजे असलेले,भक्तिगीतांपासून लावण्या व ग्रामीण संगीतापासून चित्रपट संगीत व गीतरामायण रचणारे व ज्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणतात अशा गदिमांची अनेक गीते अजरामर झाली आहेत. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळाने (MMLA) ९ फेब्रुवारीला सुधीर फडके आणि गदिमा यांच्या स्मृतीला आदरांजली म्हणून ' ज्योतिने तेजाची आरती ' नावाचा एक