पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

६ मॅरेथॉन पूर्ण करणारे अबॉट विजेते लॉस एंजेलिस येथील श्री. सतीश कोल्ढेकर यांची मुलाखत

इमेज
 [This article appeared in BMM NewsLetter of June 2019] ६ मॅरेथॉन पूर्ण करणारे अबॉट विजेते लॉस एंजेलिस येथील श्री. सतीश कोल्ढेकर यांची मुलाखत सागर साबडे सचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ १५ एप्रिल २०१९ ला झालेल्या बोस्टन मॅरेथॉन मध्ये लॉस एंजेलिस येथील रहिवासी श्री. सतीश  कोल्ढेकर (६६ वर्षे) यांनी सहभाग घेतला व जगातील ६ प्रसिद्ध मॅरेथॉन (बर्लिन , टोकियो, लंडन, न्यूयॉर्क, बोस्टनआणि शिकागो) पूर्ण करायचा विक्रम केला. या वयात ६ मॅरेथॉन पूर्ण केलेले अमेरिकास्थित ते पहिले* मराठी भाषिक!.  मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे तब्बल २६.२ मैल अंतर पळायचे!  हि एक प्रकारची शारीरिक आणि मानसिक कसोटीच असते.  ६६ व्या वर्षी एवढे चिकाटीने पळणे, असा विक्रम करणे निश्चितच कौतुकास्पद आहे. माधव ज्युलियन यांच्या कवितेप्रमाणे "धाव त्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे" असं जरी असलं तरी पळण्याच्या बाबतीत अस्मादिकांचे पळपुटीचे धोरण असल्याने एवढा पळणारा हा माणूस नक्की काय खातो आणि त्याला एवढा वेळ कधी मिळतो याबद्दल मला कुतुहूल होते. म्हणून त्यांची मी एक छोटी मुलाखत घेतली.  त्याचा सारांश बीएमएमच्या