पळा पळा कोण पुढे पळे तो..

पळा पळा कोण पुढे पळे तो..

सागर साबडे
सचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ
secretary@mmla.org


अनेकदा आपल्या आसपास काही "हिरो" (हिरे सुद्धा म्हणू शकतो) असतात पण आपल्याला त्याची जाणीव/माहिती नसते.  आज मी आपल्या जवळच्या एका आगळ्या वेगळ्या चॅम्पियन बद्दल सांगणार आहे.  तुम्ही नियमित पळणारे असला तर तुम्हाला हे आवडेलच पण अस्मादिकांसारखे पळण्याच्या विचारांपासून दूर पळणारे असाल तर हि गोष्ट नक्की तुम्हाला प्रेरीत करेल यात शंका नाही.

मॅरेथॉन हि पळण्याची स्पर्धा माणसाच्या प्रकृतीचा, सहनशक्तीचा, चिकाटीचा मानदंड समजली जाते.  जगात अनेक मॅरेथॉन प्रसिद्ध आहेत.  त्यातील लॉस एंजेलिस, बॉस्टन, न्यूयॉर्क, शिकागो टोकियो व लंडन ह्या अधिक प्रसिद्ध स्पर्धा!   २६.२ मैल पळून येणं हि काही सोपी गोष्ट नाही.  तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे!  त्यासाठी प्रचंड तयारी करावी लागते.  आहार, निद्रा आणि एकंदरीत जीवनात एक प्रकारची स्वयंशिस्त बाळगावी लागते.

आपल्या दक्षिण कॅलिफोर्नियातील एकजण ह्या सहाही स्पर्धा पूर्ण करून आलेले आहेत असे सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.  पण श्री. सतीश कोलढेकर यांनी या सर्व स्पर्धा पूर्ण केल्या आहेत.  विशेष म्हणजे वयाच्या ४८ व्या वर्षी (२००१ मध्ये ) त्यांनी पळायला सुरुवात केली. आणि नुकतीच वयाच्या ६७ व्या वर्षी (२०१९ मध्ये) त्यांनी बॉस्टन मॅरेथॉन पूर्ण केली!  थांबला तो संपला ह्या म्हणीप्रमाणे त्यांनी स्वतःला सतत वेगवेगळ्या स्पर्धेत गुंतवून ठेवले आहे. हेच त्यांचे चिरतरुण, चिंतामुक्त आणि प्रसन्न राहण्याचे रहस्य आहे यात शंका नाही!


आमच्या माहितीनुसार या वयात ६ मॅरेथॉन पूर्ण केलेले, अमेरिकास्थित  ते एकमेव मराठी भाषिक असावेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीत - खरं तर चालणं म्हणणं बहुतेक त्यांना रुचणार नाही -- पुढील पळापळीला महाराष्ट्र मंडळातर्फे शुभेच्छा!

"चला, बघत काय बसलात, प्रेरणा घ्या आणि पळायला लागा!" असे उद्गार लगेचच माझ्या कानावर पडायला लागले आहेत.  त्यांचा उगम जाणकार वाचक ओळखतीलच तर मी आता खरंच पळतो..तुम्ही अधिक माहितीसाठी सतीश यांचे फोटो व खालील लेख पहा..
बोस्टन मॅरेथॉन पूर्ण केल्यावर पदकांसह श्री. सतीश
श्री. सतीश यांचे अबॉट पदक

सहा मॅरेथॉन मधील श्री. सतीश यांची वेळ. 

श्री. सतीश त्यांची पत्नी आणि कन्या यांच्या समवेत (न्यूयॉर्क मॅरेथॉन पूर्ण केल्यावर २०१६)


सतीश यांची मुलाखत येथे आहे.. जरूर वाचा..  

------------------------

The following English article is provided by his wife. Dr. Koldhekar

Satish Koldhekar’s story dates back 18 year at age 48 when his wife Sapna asked him to give her company while training for her first Marathon. After a few days, Satish got excited and started running. He ran his first Marathon in 2001. After running   9 LA Marathons between 2001 and 2013, Satish set his eyes on World Marathons Majors. It was not easy, since 5 out of 6 World Marathon Majors use lottery system   to select runners from all over the world with the odds of getting selected being 1 in 10 to 1 in 15. Satish ran his first Major Marathon with his daughter in the windy city Chicago in 2014. After that was Berlin in September 2015. After several failed attempts through lottery system Satish, Sapna and their daughter ran the New York Marathon which had over 55,000 runners, in November 2016. He finished  London in 2017 and Tokyo in 2018. The last one remaining was the grand daddy of all, the Boston Marathon. This required age related qualifying time to enter and run. Satish at the age of 65 came very close to the qualifying time when he ran the Cottonwood Marathon in Salt Lake City in September 2018 on his 66th birthday and the California International Marathon in Sacramento in December 2018, but no luck. His running buddies recommended the try running for a charity. Sapna also encouraged him to run Boston Marathon on a charity bib. Satish and Sapna, with the help of their friends raised over $7500 for a Boston Marathon charity supporting Children with various Cancers.
And on April 15th after running in humid, windy, rainy and hilly Boston Satish became the first Maharashtrian in USA to receive Abbott World Marathon 6 Star Medal. It was announced at the Abbott reception in Boston  that it was the first time ever that the 6 star finishers count crossed 5000 worldwide. With the help of his friends and family Satish became a part of this statistics.

For more details please visit www.worldmarathonmajors.com.
Click on the Menu bar on upper left hand corner
Select – everyday champions,
Click on 6 star finishers,
and check under nationality-American, Indian etc.

Satish's timings for all 6 marathons are listed below.  Completing marathons consistently itself is an achievement!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुल जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम

६ मॅरेथॉन पूर्ण करणारे अबॉट विजेते लॉस एंजेलिस येथील श्री. सतीश कोल्ढेकर यांची मुलाखत