पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेडा शांतीदूत

इमेज
 वेडा शांतीदूत  तुम्ही अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को ते वॉशिंग्टन डीसी या भागातील एखाद्या शहरातून जात असाल आणि एखादी ट्रॉली ढकलत या माणसाला पाहिलं तर तुम्हाला तो कदाचित गरीब, बेघर (homeless), भिकारी (begger) आहे असं वाटेल. पण तो शांतपणे पुढं पुढं जाताना दिसेल. तो तुमच्याकडं काही मागणार नाही, हातात एखादा फलक घेऊन मला काहीतरी मदत करा असं सुचवणार देखील नाही! पण तुम्ही थांबलात, त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला तो ही पायपीट का करतोय ते कळेल.  त्याचं नाव नितीन सोनावणे. तो २०२५ मध्ये सॅन फ्रान्सिस्को पासून वॉशिंग्टन पर्यंत शांतीचा संदेश घेऊन चालत चाललाय.  "ह्यानं तो नक्की काय साधणार आहे? काही आहे का याचा उपयोग?" "वेडपट आहे झालं" असं म्हणणारे अनेक त्याला भेटले आहेत. एका अर्थानं तो वेडा आहे पण हे चांगलं वेड आहे. शेवटी कोवळ्या वयात जीव देणारा भगतसिंगही वेडा होता आणि मूठभर मीठ उचलण्यासाठी पायपीट करणारे गांधीही. अर्थात मला त्याला या महान लोकांच्या रांगेत बसवायचं नाहीये. तो एवढा महान अजिबात नाहीये. तो आपल्यासारखाच अगदी सर्वसामान्य माणूस आहे ...